Monday, January 13, 2025

Latest Posts

बारामतीत अजित पवार गटाकडुन नऊ सर्व्हेत संभाव्य उमेदवार मागेच

| TOR News Network | Rohit Pawar Politics News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही मोठे विधान केले आहे. महायुतीचा उमेदवार ठरला नसून जो कोणी संभव्य उमेदवार त्यांचा आहे त्यासाठी अजित पवार गटाकडुन नऊ सर्व्हेत झालेत. त्यात तो उमेदवार मागेच आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्या सुप्रीयाताई यांचा विजय निश्चित असून त्या अडीच लाखाच्यांवर लीड घेतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. (Rohit Pawar On Baramati Lok Sabha)

हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है

“पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला. हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है! अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत. (Many leader on way to ncp sharad pawar)अनेकांना आपण परत घेऊ ,” असे ते म्हणालेत.

तसेच “बारामती मतदार संघाचे नऊ सर्व्हे अजित पवार गटाकडुन झाले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचे दिसत आहे.(Baramati lok sabha survey) सुप्रिया सुळेच त्यांच्या सर्व्हेमधे पुढे दिसत आहे. (Supriya tai ahead in survey) त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील. आणि त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील,” असा मोठा दावाही रोहित पवार यांनी केला.

दरम्यान, यावेळी बोलताना रोहित पवार यांनी बारातमीमध्ये सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला. “सागर बंगला काही गोष्टी अनेकांना देण्याचं केंद्र झालं आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडलं. भाजपचे देखील अनेक मतदार आता तुतारीला मतदान करतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखाच्यांवर असेल,” असे रोहित पवार म्हणाले. (Supriyatai will win baramati)

Latest Posts

Don't Miss