Wednesday, January 15, 2025

Latest Posts

शरद पवारांच्या डोक्यात कोण मुख्यमंत्री होणार नाही हे सांगू शकतो, पण…

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : महायुती व महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे अध्याप ठरले नाही. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष मुख्यमंत्रीपदा संदर्भात आपआपला दावा करत आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. याच सर्व घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे.(DCM Fadnavis On Cm Face) शरद पवारसाहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जवळजवळ फायनल आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.(Fadnavis on Sharad Pawar )

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरु आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत.( Mahavikas Aghadi not seen Uddhav Thackeray as cm Face) शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पाहता ठाकरे हा आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसावा, असे मला वाटते, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला. तर उद्धव ठाकरेंची इच्छा होती की, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून आघाडीने निवडणूक लढवावी.

शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाहीत हे स्पष्ट केले आणि नाना पटोलेंनीही त्याची री ओढली.(Sharad Pawar mindset for Cm Face) त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचं, हे जवळजवळ शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही हे सांगू शकतो. पण त्यांच्या डोक्यात कोण आहे, हे सांगणे फार कठीण आहे, असेही ते यावेळी म्हणाले.(its Defficult to know sharad pawar’s Mindset For Cm Face )

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व शरद पवार यांना केली आहे, तर आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवले जाईल, अशी भूमिका आघाडीतील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. पवारांच्या भूमिकेला काँग्रेसनेदेखील पाठिंबा दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या मनातही मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. (Aditya Thackeray Reaction on Devendra Fadnavis) दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. शरद पवारांच्या डोक्यात काय आहे, हे जर देवेंद्र फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची ही अवस्था नसती. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? हे त्यांना कोणी सांगितलं. पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना आधी कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती, असा टोलाच राऊत यांनी लगावला. (Sanjay Raut Slams Devendra Fadnavis)

Latest Posts

Don't Miss