Saturday, January 11, 2025

Latest Posts

मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

या मंत्र्यांवर बोलताना केले हे वक्तव्य

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात दौरा करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील हल्लाबोल करत आहेत. पुण्यातील देहूमध्ये जरांगे पाटील छगन भुजबळवर बोलत असताना त्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले. Manoj Jarange Patils Sleep of Tounge on Talking Against Maharashtra Cabinet Minister

जरांगे पाटील म्हणाले मराठ्याची आलेली सुनामी कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांची मुलं शेतातच राहिली. आरक्षण नसल्यानं ही मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. लेकरू अधिकारी होत नसल्यानं आई-बाप चिंतेत असतात. आम्ही नेमकं काय पाप केलं हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं, यासाठी लढा देतोय. पण याला विरोध होतोय. कितीही टक्के पडेल तरी पोर घरीच आहेत.आम्ही मराठे आरक्षणाच्या सगळी सवलती हे घेणार आहोत. आमच्या लेकराला आरक्षण देण्याची वेळ आली तर विरोध का? माझाकडे एक मंत्री आले होते. मला म्हणाले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही. मराठ्यांची पोटजात का होऊ शकत .नाही तर तो म्हणाला साहेबाना विचारून येतो, तो परत आलाच नाही, असं म्हणत जरांगेंनी टीकास्त्र डागलंय. जरांगे पाटील पुण्यातील देहूमध्ये बोलतानाही त्यांनी भुजबळांवर घणाघात केलाय. छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच मी त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तसंच म्हातारा म्हणत, जरांगे यांनी भुजबळांवर टीका केलीय.

Latest Posts

Don't Miss