Sunday, January 12, 2025

Latest Posts

Gautam Gambhir मला रोज मिसकॉल द्यायचा

बॉलिवूड अभिनेत्रीने केलेल्या आरोपाने खळबळ

Bollywood Actress On Gautam Gambhir : बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वाचं नातं अत्यंत घट्ट आहे.अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंसोबत लग्न केलं. काहींचे एकमेकांसोबत प्रेम संबंध देखील होते.आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने क्रिकेटपटू गौतम गंभिरवर गंभिर आरोप केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.इरफान पठाणला पाच वर्षांपासून डेट करत असल्याचा दावा करण्यापासून ते मोहम्मद शमीशी लग्न करण्याची आणि त्याची दुसरी पत्नी बनण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत तिच्या विधानांमुळे ती आता परत चर्चेत आली आहे.

बॉलिवूडच्या एका प्रसिध्द अभिनेत्रीने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर आरोप केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पायल घोष आहे. (Payal Ghosh Talk About Her Relationship With Former Cricketer Irfan Pathan And Miss Call From Gautam Gambhir) पायल घोष कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री लक्षवेधी वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोष इरफान पठाणसोबत रिलेशनशिपमध्ये असताना गौतम गंभीर तीला मिसकॉल देत असल्याचा आरोप केला आहे.  दरम्यान, पायलने आणखी एक धक्कादायक दावा करून सर्वांना हैराण केलं आहे. पायलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठा दावा केला आहे. जेव्हा पायल आणि इरफान पठाण एकमेकांना डेट करत होते, तेव्हा नक्की काय घडलं होतं. याचा खुलासा अभिनेत्रीने केला. एवढंच नाही तर, पायल हिने गौतम गंभीर याच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.पायल म्हणाली गौतम गंभीर रोज मला मिसकॉल द्यायचा. ही गोष्ट इरफान पठाण याला देखील चांगल्या प्रकारे माहिती होती. तो माझा फोन तपासून पाहायचा. ही गोष्ट इरफानने माझ्यासमोर यूसुफ भाई, हार्दिक आणि क्रुणाल पंड्या सांगितली होती. त्यावेळी बडोद्यात एक सामना होता…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पायल घोष हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.तर दुसऱ्या पोस्टमध्ये इरफान पठाण याच्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘आमचं ब्रेकअप झाल्यानंतर मी प्रचंड आजारी पडली होती. कित्येक वर्ष मी काम देखील करु शकली नाही. तो एकच मुलगा होता, ज्याच्यावर मी अफाट प्रेम केलं. त्यानंतर मी कधीच कोणावर प्रेम केलं नाही..’ असं देखी पायल म्हणाली. पायम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पायलने ट्विटरवर ‘मोहम्मद शमीशी लग्न करायला तयार आहे, पण त्याने स्वतःची इंग्रजी सुधारायला हवी…’ असं म्हणत अभिनेत्रीने मोहम्मद शमीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

Latest Posts

Don't Miss