Saturday, January 11, 2025

Latest Posts

चाहत्यांना धक्का : पुनम पांडेचं निधन

Poonam Pandey Death News : बोल्डनेसमुळे चर्चेत असणाऱी सेलिब्रेटी पुनम पांडेचं निधन (Poonam Pandey Death) झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या इंस्टा अकाउंटवरुन आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.(Celebrity Poonam Pandey Death)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हिकल कँसरनं (गर्भाशयाच्या कँसरनं) पुनमचे निधन (Poonam Pandey Death News Viral ) झाले आहे. तिच्या इंस्टावरील पोस्टनं चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या टीमकडून इंस्टावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टनं मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

बोल्डनेसमुळे पुनमच्या नावाची नेहमीच मनोरंजन विश्वात चर्चा होती.(Bold Model Poonam Pandey Death ) तिनं गेल्या वर्षी कंगनाच्या (Model Poonam Pandey Death Viral) लॉकअप नावाच्या रियॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यातून पुनमची लोकप्रियता वाढली होती. पुनमनं अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रेटींशी पंगा घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

याबाबत फ्री प्रेस जर्नलनं सविस्तर वृत्त दिलं आहे. गुरुवारी रात्री पुनमचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. कानपूर येथे असणाऱ्या पुनमच्या राहत्या घरी तिचं निधन झाले आहे. तिच्या अंत्यसंस्काराविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पुनमच्या त्या इंस्टा अकाउंटवरुन तिच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार, हे सांगणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. तिला सर्व्हिकल कँसर झाला होता.

Latest Posts

Don't Miss