Saturday, January 11, 2025

Latest Posts

उजनी धरणात बोट उलटून 6 जण बेपत्ता

| TOR News Network |

Ujani Dam Boat Sank News : उजणी धरणाच्या पात्रात, भीमा नदीत काल एक मोठी घटना घडली. या धरणात एक बोट उलटली असून या बोटीत प्रवास करणारे ६ जण अद्याप बेपत्ता आहेत. (6 Drowned in Ujani dam) तर एक जणाला पोहता येत असल्याने तो किनाऱ्यावर पोहचला. सध्या NDRF पथक या ठिकाणी पोहचले आहे. पथकाकडून शोध मोहिम राबविण्यात येत आहे. (Ndrf  Search operation in ujani dam)

करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली.( Boat overturned due to the storm) बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते. त्यात एक वर्षांचे मुल असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.(Boat sank due to storm)

आतापर्यंत सहा प्रवाशांची कुठलीच माहिती समोर आलेली नाही. रात्री शोध मोहिमेत अडथळे आले. रात्री जवळपास 9 वाजता शोध मोहिम थांबविण्यात आली.आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. (Ujani Dam Search operation) NDRF ची टीम कळशी गावात पोहचली आणि तिने शोध मोहिम सुरु केली आहे. शोध मोहिमेसंबंधीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी व्यापक शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.(Pune gramin police on Ujani dam) एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिस शोध मोहिमेत सहभागी आहेत. दुर्घटनेवेळी चार पुरुष, दोन महिला आणि दोन छोट्या मुलींसह एकूण 7 प्रवाशी या बोटीत होते. त्यातील एक जण पोहता येत असल्याने वाचला.(One survived because he could swim)

Latest Posts

Don't Miss