Monday, November 18, 2024

Latest Posts

भाजपची महत्त्वाची वोटबँक शिंदे सेनेच्या टार्गेटवर

| TOR News Network |

Mahayuti Latest News : राज्यातील विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या  तरी राजकीय घडामोडींना  वेग आला आहे. महायुतीकडून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठीही  महायुतीचे  प्रयत्न सुरू आहे. यातच शिवसेना शिंदे गटाने मुंबईमधील भाजपवर नाराज असलेल्या व्होटबँक आपल्या टार्गेटवर ठेवले आहे.( Shinde Sena to target bjp Vote bank)

 काही महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील जनतेने भाजपला जोरदार दणका दिला होता. (North Indian voters refuse bjp) भाजपची महत्त्वाची वोटबँक असलेल्या उत्तर भारतीय मतदारांनीच भाजपकडे पाठ फिरवल्याने भाजपचे मोठे नुकसान झाले. तसेच महाराष्ट्रातही झाले. महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांनीही भाजपच्या पारड्यात आपली मते दिली नाहीत. परिणामी उत्तर भारत आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे अपयश आले. लोकसभा निवडणुकीत झालेली हीच चूक सुधारण्यासाठी आता शिवसेनेने उत्तर भारतीयांचा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे.(Shivsena to damage control north indian votes)

विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांनी आपल्या पारड्यात मते टाकावीत यासाठी शिंदे गटाने त्यांची मन वळवण्याची मोहिम सुरू केली आहे.(Shinde sena to catch north indian votes) खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यासाठी नरेश म्हस्के यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत जे उत्तर प्रदेशात झाले ते विसरुन जा आणि तीच चूक आता पुन्हा करु नका, उत्तर भारत आणि महाराष्ट्रात फरक आहे. इथे आमचे सरकार आहे तुम्हाला न्याय नक्कीच न्याय मिळेल,’अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी उत्तर भारतीयांना भावनिक साद आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss