Sunday, January 12, 2025

Latest Posts

महायुतीच्या त्या नेत्याचा भाजप प्रचार करणार नाही

| TOR News Network |

Nawab Malik Latest News : नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यावरून महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने कडाडून विरोध केला आहे. मात्र असं असताना नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यांनी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही तास असताना अर्ज दाखल केला. नवाब मलिक हे अजित पवारांच्या पक्षाकडून मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.(nawab Malik to contest from mahayuti) मात्र या निर्णयानंतर आता भाजपाने कठोर भूमिका घेत अजित पवारांच्या पक्षाला आगामी प्रचारासंदर्भात भाष्य करताना थेट सहकार्य करणार नाही असं सांगितलं आहे. (Bjp Against Nawab Malik)

‘भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही’, असा पुनरुच्चार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी केला. (Ashish Shelar on nawab malik) मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार शेलार म्हणाले, “भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही”, असे आशिष शेलार म्हणाले.

नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. (sana malik mahayuti candidate) साना मलिक यांच्या प्रचारासंदर्भात विचारलं असता आशिष शेलार , “यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही,” असं म्हणाले.

Latest Posts

Don't Miss