Saturday, January 11, 2025

Latest Posts

भाजपवाले एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

| TOR News Network | Sanjay Raut on Bjp : भाजपवाले ईडी आणि सीबीआय मागे लावून एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते (उबाठा गट) आणि खासदार संजय राऊत यांनी केला. (Bjp was planning to send Eknath shinde into jail) भाजपमध्ये एकतर भ्रष्टाचाऱ्यांना स्थान आहे किंवा खोट बोलणाऱ्यांना जागा आहे. एखादा माणूस भाजपमध्ये गेला की, त्याला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग दिलं जातं, (Bjp gives Training is talk lie)असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं. (Sanjay Raut Speaks on Bjp Plan)

राऊत म्हणालेत शिंदे यांना तुरूंगात जायच नाही म्हणून ते कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना. स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून पळाले, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. त्या मुद्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट करत एकनाथ शिंदे आणि भाजपावर आरोप केले.

“जून 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं.(shelar,mahajan,darekar,fadnavis behind the plan) भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच महाविकास आघाडीच प्लानिंग होतं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss