Sunday, January 12, 2025

Latest Posts

भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकते माप; भाजपमध्ये ‘नाराजीनाट्य’

| TOR News Network |

Eknath Shinde Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहे. (Pm Modi in Mumbai on 5 october) यावेळी ते मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात करणार आहे. (Modi to inugrate metro in thane) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे ठाण्यात कार्यक्रम होत असल्याने भाजपमधील नेते अन् कार्यकर्ते नाराज झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे म्हटले जात आहे.(bjp workers restless deu to eknath shinde)

राज्यातील विविध महामंडळांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे सत्तेतील लाभ व महत्वाची पदे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मिळत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होत आहे. भाजप कार्यकर्त्यांना त्याग अन् काम करण्याचे धडे पक्षातील श्रेष्ठींकडून देण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदार संघाचा तिढा चांगलाच पेटला होता. भाजप कार्यकर्ते ठाणे मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यास तयार नव्हते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दबाव आणून ही जागा शिंदे गटाला सोडण्यास भाग पाडली. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने ठाणे जिल्ह्यातील भाजपला हव्या असलेल्या काही जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे श्रेय शिंदे आणि पवार गटाला मिळत असल्याने भाजपमध्ये नाराजी वाढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहे. या दौऱ्यात आरे कॉलनी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे बीकेसी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचे उद्धघाटन ठाण्यातून ते करणार आहे. १२ किलोमीटरचा हा मार्ग आहे. या टप्प्यात एकूण १० स्थानके असणार आहे. तसेच यावेळी नरेंद्र मोदी राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत.

Latest Posts

Don't Miss