Saturday, January 11, 2025

Latest Posts

मराठा समाजाला खुश करण्यासाठी भाजपाची प्लॅनिंग

| TOR News Network |

Bjp Planing To Make Maratha Samaj Happy : मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बघता भाजप आता अलर्ट मोडवर आली आहे.(Bjp On Alert Mode) लोकसभेत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला होता. (Maratha community News) ते लक्षात घेता दादरमधल्या वसंतस्मृतीच्या भाजप कार्यालयातील बैठकांमध्ये विचारमंथन केल्यानंतर नरीमन पॉईंटमधल्या भाजप प्रदेश कार्यालयात मराठा आमदारांची बैठक पार पडली. (BJP Maratha Mla Meeting) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आमदारांमधील अस्वस्थता कमी करत विश्वास देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

भाजप पक्षनेतृत्वाकडून आमदारांच्या कामाचं विश्लेषण होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा मतं कमी मिळवून दिलेल्या आमदारांच्या कामाची झाडाझडती देखील होणार आहे. (Work analysis Of Bjp Mla) भाजपनं मराठा समाजासाठी केलेलं काम समाजापर्यंत पोचवण्यात मराठा आमदार अयशस्वी ठरल्याचा दावा केला जातोय. देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण मराठा समाजासाठी सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला दिलेला निधी या सगळ्या गोष्टी पोचवण्यात मराठा आमदार मागे राहीले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आपल्याला फटका बसू नये यासाठी मराठा आमदारांच्या बचावात्मक पवित्र्याचा भाजपला फटका बसल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं. (Maratha Samaj News) त्यामुळे याच मराठा आमदारांची आज झाडाझडती झाली. भाजप सरकारनं समाजासाठी केलेलं काम समाजापर्यंत पोचवण्यासाठी मराठा आमदारांची भाजपने चांगलीच शाळा घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.तसेच मराठा समाजाला खूष करण्यासाठी भाजपने प्लॅनिंग केल्याची माहिती आहे.(Bjp Planing For Maratha Samaj)

भाजपच्या दादर येथील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रक्षा खडसे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण, छत्रपती उदयनराजे, सर्व खासदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या.

Latest Posts

Don't Miss