Monday, January 13, 2025

Latest Posts

गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं षडयंत्र

खासदार संजय राऊतांनी सांगितले कारणं

| TOR News Network | Sanjay Raut On Nitin Gadkari : भारतीय जनता पार्टीने नुकतेच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली.मात्र या यादीत वजनदार अशी प्रतिमा असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही.(No Name Of Gadkari In first List Of Loksabha 2024) त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधान आले आहे.नितीन गडकरी यांना डावललं जातंय असं म्हणत यावर खासदार संजय राऊतांनी याची कारणेही सांगितली आहेत.(Nitin Gadkari is being dropped)

नितीन गडकरी हे एक परखड आणि स्पष्टवक्ते असलेले नेते आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्यामळे ते दिल्लीची गुलामी पत्करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे.(Nitin Gadkari straight forward Person) नितीन गडकरी हे विकासाला महत्व देतात. फसवणुकीला ते महत्व देत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता नाही

आपल्या देशातील विकासामध्ये सर्वात मोठं योगदान नितीन गडकरी संभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे. गडकरी फसवणुकीला महत्व देत नाहीत. अशा व्यक्तीला दिल्लीत पुन्हा संधी मिळाली तर २०२४ मध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोणी नितीन गडकरींचे नाव पुढे केले तर ते तेथे असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचं हे षडयंत्र आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.(Conspiracy against Nitin Gadkari)

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. (Sanjay Raut Slams Pm Modi)या देशातील जनता कोणत्या परिस्थितीत जगत आहे हे तुम्हाला माहिती आहे. तरी देखील तुमच्या परिवारात मणिपूर आणि कश्मीरी पंडित येत नाहीत का? असा सवाल राऊतांनी भाजपला विचारला आहे.

राऊत म्हणाले हा तर गडकरींचा अपमान

तुमचा परिवार पक्षफोडणाऱ्यांचा परिवार

मोदींनी कश्मीरी पंडीतांच्या घरवापसीसाठी आश्वासने दिली. ते तुमच्या परिवारात येत नाहीत का? तुमचा परिवार हा फक्त लुटमार आणि पक्षफोडणाऱ्यांचा परिवार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत असाल, तर यावेळी जनता तुम्हाला चोख उत्त देईल, अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

Latest Posts

Don't Miss