Sunday, January 12, 2025

Latest Posts

विधान परिषदेसाठी भाजपच्या यादीत या नेत्यांची नावे फायनल

| TOR News Network |

Vidhan Parishad Bjp News : सध्या विधान परिषदेसाठी सर्व पक्षातील नेते आपल्या सोयीनुसार फिल्डींग लावत आहेत. काही नेते मुंबईत ठाण मांडून आहेत. या सर्व धावपळीत मात्र भाजपने आपली यादी फायनल केली आहे. 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीत महायुतीत जवळपास 6 जागा भाजपच्या वाट्याला येतील. (vidhan parishad bjp seats) यासाठी कोणाला संधी द्यावी याची शिफारस भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला करण्यात आली आहे. (bjp Candidate for vidhan parishad) जवळपास 10 नावांची शिफारस करण्यात आली असून त्यातील किती जणांना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यात काही नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांना विधान परिषदेवर घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा नियोजन प्रदेश भाजपचे दिसत आहे.(Vidhan Parishad Bjp List)

प्रदेश भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावांची शिफारस केली आहे.(10 Candidate From bjp in mahayuti for vidhan parishad) त्यात लोकसभेत पराभूत झालेल्या काही नेत्यांची नावे ही आहेत. त्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश आहे. (Pankaja Munde on Vidhan Parishad) पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदार संघातून निसटत्या फरकाने पराभूत झाल्या. तर रावसाहेब दानवे यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. ते जालना लोकसभा मतदार संघातून हरले. तर महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदार संघातून पराभवाचा सामना कराला लागला. हे तीनही नेते विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याची शिफारस प्रदेश भाजपने केले आहे.(Rao Saheb Danve on vidhan Parishad) त्यांचे पुनर्वसन केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल असे पक्षाला वाटते.

या तीन नावां बरोबरच आणखी सात नावांची शिफारस केली गेली आहेत. त्यात अमित गोरखे,परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ,  माधवीताई नाईक आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे अशी खात्री लायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या नावांमध्येही महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, परिणय फुके, पंकजा मुंडे यांची नावे ठळक पणे दिसून येतात. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढायचे आहे. Parinay Fuke, Harshvardhan patil on Vidhan Parishad) मात्र जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली जावू शकते. तर चित्र वाघ हा पक्षातला आक्रमक महिला चेहरा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेही त्यांचा विचार केला जावू शकतो.(Chitra Wagh On Vidhan Parishad)

Latest Posts

Don't Miss