Saturday, January 11, 2025

Latest Posts

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने हिंदुत्वाला केले तडीपार….

भाजप नेते आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना खरमरीत टोला

Ashish Shelar on Uddhav Thackeray : ‘इंडिया आघाडी’ची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. (India Allaince Rally) त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींवर कडाडून टीका केली. मात्र आता याच सभेतील भाषणावारून भाजपाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला.हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने हिंदुत्वाला केले तडीपार अशी टीका त्यांनी समाज माध्यसातून केली. (Ashish Shelar Slams Uddhav Thackeray)

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते का

भारत जोडो यात्रेची सांगता सभा मुंबईत झाली.यावेळी शेलार सह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. या सभेवरुन आशिष शेलार म्हणाले आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला सभेत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. तर “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का ? असा सवाल विचारत आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. (Bjp Shelar on Shivsena uddhav thackeray)

जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही

एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक क्लिप शेअर करत पोस्टही लिहीली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आधीचे भाषण आणि रविवारचे भाषण यांची तुलना करून दाखवण्यात आली. ‘ आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.’ अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.(Bawankule slams uddhav thackeray)

आशिष शेलार यांनी केले  ट्विट

आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का ?  हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झालीये.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली.. अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.एवढंच नव्हे तर ‘ काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल”, आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!! अला टोलाही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Latest Posts

Don't Miss