| TOR News Network |
Harshvardhan Patil Latest News : इंदापूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावात कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केलीय. त्यामुळं पाटलांनी महायुतीत वेगळी चूल मांडल्याची जोरदार चर्चा आहे. इंदापूरच्या मैदानात पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.(Harshvardhan patil to contest independent)
शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा धक्का दिलाय. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि राजकारणातील तरुण नेतृत्व प्रवीण माने उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणारेत.(Pravin mane to join sharad pawar NCP) इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून प्रवीण मानेंच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. विधानसभेचा शब्द शरद पवारांनी माने कुटुंबाला दिला असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. आणि त्यानंतरच हा पक्षप्रवेश निश्चित झाला असल्याचं सांगितलं जातंय. पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणारेय.
1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि जिंकल्या. 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी विमान चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती.(Harshvardhan patil 3 times contest vidhansabha as indipendent) हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी. हर्षवर्धन पाटलांनी मध्यंतरी काँग्रेसमध्ये प्रेवश केला होता
मात्र, आघाडीत अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. आता पुन्हा तेच अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरत असल्यानं कार्यकर्ते पेटून उठलेत. इच्छुकांची संख्या वाढल्यानं इंदापूरमध्ये यावेळी काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत. – हर्षवर्धन पाटलांनीही इंदापूरमधून लढण्याचे संकेत दिलेत.(Harshvardhan patil to contest from indapur) याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे देखील इच्छूक आहेत. युवा नेते आणि सोनाई उद्योगसमूहाचे संचालक प्रवीण मानेही इच्छुकांच्या रांगेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इंदापूरमधून अपेक्षित मतं मिळाली नाहीत. भाजप आणि मोदींवरील नाराजीचा फटका बसल्याची चर्चा होती. त्यातच तालुकास्तरीय आघाडी काढून हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना बळ दिलंय. उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानंच हर्षवर्धन पाटलांनी आतापासूनच अपक्ष म्हणून मोर्चेबांधणी सुरू केल्याचं सांगितलं जातंय..