Thursday, January 16, 2025

Latest Posts

इव्हीएम है तो मोदी है

Sanjay Raut On EVM : भारतीय जनता पक्ष हा एक डरपोक पक्ष आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. लोकांमध्ये जायची त्यांच्यात हिंमत नाहीये. इव्हीएम किंवा चंदीगड पॅटर्न नसेल, तर भाजपा जिंकू शकत नाही.इव्हीएम है तो मोदी है असं ते म्हणाले. (Modi is Winning Due To Evm )आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडल्यामुळे विरोधकांना धक्का बसलेला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांचा जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. (Sanjay Raut ) ईव्हीएम व चंदीगडमधील घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. (Sanjay Raut on Chandigarh Pattern)

राऊत पुढे म्हणाले “उत्तर प्रदेशच्या चंदौलमध्ये एका दुकानात २०० इव्हीएम मशीन मिळाल्या आहेत. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमध्ये ३००हून जास्त इव्हीएम मशीन सापडल्या. तो ट्रकही भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. हा काय खेळ आहे?” असा सवाल त्यांनी केला.

काय घडलं चंदीगडमध्ये?

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी चंदीगडमधील राजकीय घडामोडींचा दाखला दिला. “या देशात भाजपा सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही. (Without EVM Bjp Cant Win) ईव्हीएम हटली तर भाजपा गेली. इव्हीएम है तो मोदी है.(Evm is winning Formula for Bjp) चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत होतं. दोघांच्या मिळून २० जागा होत्या. भाजपाकडे १४ जागा होत्या. मतदान आप व काँग्रेसच्या बाजूने झालं. पण तरीही पीठासीन व्यक्तीनं ८ मतं बाद केली. विजयी होत असलेल्या काँग्रेस-आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपाचा महापौर विजयी ठरवला. हा चंदीगड पॅटर्न भाजपानं आणला आहे”, असं राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss