Saturday, January 11, 2025

Latest Posts

भाजप त्यांच्या पॉर्नस्टारला पुढे करुन आमच्यावर आरोप करतायेत – संजय राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News :  २०२२ साली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना यांनी मीरा भाईंदर शौचालय घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते. (sanjay raut on medha Somaiya ) त्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रु नुकसानीच्या खटला दाखल केला होता. त्यात शिवडी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कैद सुनावली. (Sanjay raut 15 days jail) यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या देशात न्याय विकत घेतला जातो. न्याय मिळत नाही असे संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपची लायकी ही आहे की त्यांनी पॉर्नस्टारला पुढे करुन आमच्यासारख्या सर्वांवर आरोप करायला लावत आहेत. पण आम्ही दुर्लक्ष केले असेही ते म्हणालेत.(Sanjay Raut Slams Bjp)

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊतांना अब्रु नुकसानीच्या खटल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिले. मी एक लवकरचा चित्रपट काढणार आहे. बाई मी विकत घेतला न्याय, असा हा सिनेमा असेल. या देशात न्याय विकत घेतला जातो. न्याय मिळत नाही. ज्याप्रकारे न्याय व्यवस्थेचे संघीकरण झाले आहे, दबाव टाकला जात आहे. भाजपचा एक पॉर्नस्टार आमच्यावर आरोप करतो, त्यावर काय बोलणार. उगाचच सर्वांवर खोटे आरोप केले जातात, असे संजय राऊत म्हणाले.

 “भाजपची लायकी ही आहे की त्यांनी पॉर्नस्टारला पुढे करुन त्यांनी आमच्यासारख्या सर्वांवर आरोप करायला लावत आहेत. (Sanjay Raut on Bjp pornstar) आम्ही दुर्लक्ष केले. पण मिरा भाईंदरसारख्या ठिकाणी आम्ही पुराव्यांसह काही भूमिका मांडल्यावर पॉर्नस्टारच्या कुटुंबियांची बेअब्रू झाली. न्यायव्यवस्था तुमच्या हातात आहे. दबाव आहे. आम्ही वरच्या कोर्टात जाऊ”, असे संजय राऊतांनी सांगितले.

“याप्रकरणी मी आरोप केले नव्हते, मिरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुरव्यासह तक्रार दाखल केली होते. प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून आरोप केले होते. यात मी कुठेच नाही हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मी हा घोटाळा काही कोटींचा आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असे म्हटले”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

 “कारण हे पॉर्न स्टार विक्रांत घोटाळा प्रकरणी जे आरोप करतात, त्याची चौकशी झाली पाहिजे. (Sanjay Raut on Vikrant Scam) तेव्हा तर हे बाप बेटे पळून गेले होते, त्यांचं सरकार आल्यावर पुन्हा चौकशी बंद केले. पॉर्न स्टार तुम्ही हिशोब द्या. पॉर्न स्टारच्या पत्नीचा अपमान झाला असेल तर त्यांनी आपल्या पॉर्न स्टार पतीकडे न्याय मागवा”, असेही संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss