Saturday, January 11, 2025

Latest Posts

पुढे भारत पाकिस्तान सामना अन् बिशन सिंग बेदींनी थांबवला खेळ

का संतापले होते बेदी…तो निर्णय काय होता जाणून घ्या

द सरदार ऑफ़ स्पिनने ओळखले जाणारे बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) (७७) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.मात्र फिरकीचा जादूगार बेदी यांच्या आठवणी भरपूर आहेत. आपण बेदी यांच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या त्या निर्णया विषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे बेदी संतापले होते आणि सुरु असलेला सामना त्यांनी थांबवला होता. 

अनुभवी डावखुरे फिरकीपटू बेदी हे भारतीय क्रिकेटचा चेहरा होते. ज्यांनी केवळ मैदानावरील आपल्या कामगिरीने चमक दाखवली नाही, तर आपल्या नेतृत्वाने एक उदाहरणही ठेवले आणि आपले विचार व्यक्त करण्यात कधीही मागेपुढे पाहिले नाही. बिशनसिंग बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी सामन्यात २६६ विकेट घेतल्या आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे १५६० विकेट्स आहेत. तसेच बेदी यांनी २२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले आहे. बिशन सिंग बेदी जलद बुद्धी आणि स्पष्ट वक्ते वृत्तीसाठी ओळखले जायचे. त्यामुळे ते अनेकदा वादात देखील अडकले होते. (India Pakistan) भारत पाकिस्तान सामन्या विषयी जशी उत्कंठा आज असते तशीच बेदी यांच्या काळात देखील असायची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं होतं की जेव्हा पंचांचा निर्णय न जुमानता कर्णधाराने स्वतः प्रतिस्पर्ध्याला हातचा विजय काढून दिला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाक संघाने रडीचा डाव खेळला होता ज्यावर बेदी चांगलेच संतापले होते. १९७८ मध्ये जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी गेला होता, तेव्हा बिशन सिंह बेदी हे कर्णधार होते.  तीन सामन्याच्या श्रृंखलेत पहिला सामना भारताने जिंकला होता.तर दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने गुणांची बरोबरी केली होती. तिसऱ्या व निर्णायक सामन्यात भारताला जिंकण्यासाठी १४ चेंडूंमध्ये २३ धावांची गरज होती आणि समोर सरफराज नवाज या गोलंदाजांचे आव्हान होते. सरफराजने यावेळी गोलंदाजी करताना सलग चार वेळा बाउन्सर टाकला होता पण एकाही वेळेस पंचांनी त्याला वाईड बॉल दिला नाही. पाकिस्तानी गोलंदाज असा प्रयत्न करत होते की भारतीय फलंदाज इच्छा असून एकही फटका मारू शकत नव्हते. सलग चार वेळा पाकिस्तानकडून एकच चूक होत असल्याचे पाहून भारतीय कर्णधार बेदी  चांगलेच संतापले आणि ड्रेसिंग रूमच्या बाहेर आले व पाकिस्तानचा कर्णधार मुश्ताक मोहम्मद याला प्रश्न करू लागले. यातुनच त्यांचा वाद सुरु झाला आणि बेदी यांनी रागात हातात आलेला सामना पाकिस्तानला भेट म्हणून देत भारतीय फलंदाज माघारी बोलावून घेतले होते. बेदी यांच्या या स्वभावाची व निर्णयाची साहजिकच नंतर प्रचंड चर्चा झाली होती. बेदी यांना १९७०  मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे.

बेदी यांच्या नावावर असलेले विक्रम

बिशन सिंग बेदी हे एकमेव भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी वनडे सामन्यात 8 षटके मेडन टाकली आहेत. या सामन्यात त्यांनी १२ षटके टाकली, ज्यात 8 षटके मेडन होती. यादरम्यान त्यांनी ६ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.बिशन सिंग बेदी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट घेतल्या आहेत. जे इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे.बेदी हे जवळपास चार दशके एकाच रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते. १९७४-७५ च्या मोसमात ६४ बळी घेत त्यांनी हा विक्रम केला.बेदी यांनी १९६६ ते १९७९ दरम्यान ६७ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी २६६ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारे ते भारताचे पहिले गोलंदाज होते.बेदी हे १९७५ च्या विश्वचषक संघाचा भाग होते. बिशनसिंग बेदीने या स्पर्धेत पूर्व आफ्रिकेविरुद्ध सलग दोन मेडन षटके टाकली होती. असा करिष्मा इतर कोणत्याही गोलंदाजाला करता आलेला नाही.

Latest Posts

Don't Miss