Saturday, January 11, 2025

Latest Posts

बर्थडे बाॅय Virat ची कमाई माहित आहे का? Instagram वर एक पोस्टसाठी घेतो इतके पैसे 

आज विश्वचषकात भारत विरुध्द द.अफ्रिका असा महत्वाचा सामना दुपारी 2 वाजता कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. मात्र आजच्या या सामन्याला एक विशेष महत्व प्रप्त झाले आहे. आज 5 नोव्हेंबरला भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. (Virat Kohli Birthday) त्या  निमित्त विराट कोहलीची  कमाई आपण जाणून घेणार आहोत.शिवाय तो इस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी किती पैसे मोजतो हे पण आपण जाणणार आहोत.(Virat Kohli Gets This much Amount from Instagram for a Single Post)

जगातल्या लोकप्रिय खेळाडूंच्या यादीत असलेला विराट भारतीय संघातील एक आक्रमक फलंदाज आहे. 35 वर्षाच्या विराटला एकदिवसीय,टी-20 किंवा कसोटीच्या प्रकारात तोड नाही. विराटने एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत 48 षटके ठोकले आहेत.जर आजच्या सामन्यात त्याने शतक केले तर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकाची बरोबरी करु शकतो.तशी संधी त्याला नेमकी वाढदिलसाच्या दिवशी प्रप्त झाली आहे.त्यामुळेच त्याच्या जगभरातील चाहत्यांसाठी आजचा सामना विशेष असणार आहे.चिकू या टोपन नावाने ओळखला जाणाऱ्या विराटच्या नेतृत्वात भारताने 2008 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.तेव्हापासूनच कोहलीच्या आक्रमकतेचा परिचय सर्वांना आहे.कोहली आज भारतातील सर्वांत महागडा क्रिकेटपटू आहे.त्याच्या उतपन्नाचे स्त्रोत अनेक आहेत.मिडिया रिपोर्टनुसार विराटची एकूण संपत्ती 1050 कोटी आहे.जी जगभऱ्यातील सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आहे.त्यात त्याला बीसीसीआयने ए प्लस श्रेणीचा वर्षभराचा करार केला आहे.त्यासाठी त्याला 7 कोटी रुपये मिळतात.तसेच त्याला प्रत्येक एक दिवसीय सामन्यासाठी 6 लाख ,कसोटीसाठी 15 लाख तर टी-20 साठी 3 लाख रुपये मिळतात.त्या शिवाय विराटला आयपीएलच्या एक हंगामासाठी राजस्थान राॅयल्सकडून (2023) 15 कोटी रुपये मिळतात.त्या शिवाय विराट 18 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे.त्या कंपन्यांच्या जाहिरातीतून तो वर्षाला 10 कोटी पेक्षा अधिक पैसे कसवतो. शिवाय विराट समाज माध्यमातून देखील मोठी कमाई करतो.विराटचे इस्टाग्रामवर 221 मिलियन पेक्षा अधिक फाॅलोअर्स  आहेत.जे भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक मानल्यात जातात.विराटला इस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी जवळपास 8.9 कोटी रुपये मिळतात.तो इस्टाग्रामवर सक्रिय असतो.

Latest Posts

Don't Miss