Friday, January 17, 2025

Latest Posts

अब्जाधीशची संपत्ती पण मुलगा भारतीय लष्करात करतोय काम

Malaysia New King : तुम्हाला ही बातमी वाचून धक्काच बसेल. त्याचे कारण देखील तसेच आहे. वडीलांकडे अब्जाधीशची संपत्ती असतानाही मुलगा मात्र लष्करात काम करत आहे.  मुस्लिम राष्ट्र असलेल्या मलेशियाचे नवीन राजे म्हणून इब्राहिम इस्कंदर यांची निवड झाली आहे. (Billionaire Sultan Ibrahim Iskandar) त्यांच्याकडे ४७ लाख कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे.(Malaysia New King Is Billionaire) पण त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम करत आहे.

त्यांची संपत्ती आणि राजेशाही थाट पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे. त्यांची स्वत:ची खासगी आर्मी आहे. ३०० पेक्षा जास्त लग्झरी गाड्या त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे अनेक जेट विमान आहेत. परंतु इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माइल इदरीस हे भारतीय लष्करात अधिकारी आहेत. आता ते कॅप्टन झाले आहे.

राजा म्हणून शपथ

६५ वर्षी जोहोर येथील सुलतान इब्राहिम इस्कंदर मलेशियाच्या राजसिंहासनावर बसले आहे. अब्जाधीश म्हणजे धनकुबरे असलेले सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी बुधवारी मलेशियाचा १७ वा राजा म्हणून शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी ते त्यांच्या खासगी जेटमध्ये आले होते. १९५७  मध्ये मलेशियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु या देशातील नऊ राजघराण्यांचे प्रमुख दर पाच वर्षांनी राजा बनतात. मलेशियामध्ये १३ राज्ये  असून नऊमध्ये राजघराणे आहेत. तसेच पेराक राज्याचा शासक आणि सिंहासनाचे पुढील वारसदार सुलतान नाझरीन यांची उपराजा म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.

मुलगा भारतीय लष्कारात

इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माईल भारतीय लष्करात अधिकारी आहे. (Tunku Ismail In Indian Army) त्यांचे आजोबा भारतीय लष्कारात होते. टुंकू जुलै २००३ मध्ये डेहराडून स्थित IMA मध्ये कॅडेट अधिकारी म्हणून दाखल झाले होते. त्यानंतर डिसेंबर २००४ मध्ये ते भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. डिसेंबर २००७ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली. त्याचे वडील आणि आजोबा यांनीही आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतले.

इब्राहिम यांच्याकडे किती आहे संपत्ती

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इब्राहिम यांच्याजवळ ५.७ दक्षलक्ष डॉलर म्हणजे ४७.३३ लाख कोटी रुपये संपत्ती आहे. त्यांनी शाही परिवार पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि कॅबिनेट सदस्यांच्या उपस्थितीत एका समारंभात शपथ घेतली. सुल्तान इब्राहिम यांच्याकडे रिअल इस्टेटपासून दूरसंचार आणि वीज उपकरण बनवण्याचे उद्योग आहे.

Latest Posts

Don't Miss