Thursday, January 16, 2025

Latest Posts

रोहित पवारांना धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ

| TOR News Network | Rohit Pawar Latest News : सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात आता रोहित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. (Rohit Pawar supporter joined Ajit Pawar Group) त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. (Big Shock to rohit pawar)

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशातच रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. (Big Shock to rohit pawar in karjat jamkhed)

रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.(Akshay shinde join ajit pawar) मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अक्षय शिंदे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्याबरोबर सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्यांनी अजित दादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.(Akshay shinde left rohit pawar)

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथे आज दुपारी दोन वाजता जाहीर सभा होणार आहे. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा होणार आहेत.

Latest Posts

Don't Miss