| TOR News Network |
Mahayuti survey latest News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत काटे की टक्कर होईल असे कार्यकर्ते सांगत असताना त्यात आता ट्विस्ट आले आहे. महायुतीने विदर्भात केलेल्या अंतर्गत सर्वेची माहिती समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. (Mahayuti Vidarbha Internal survey)
राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आढावा घेण्यासाठी स्वतःचे सर्व्हे सुरू केले आहेत. महायुतीकडून राज्यभरात असे अंतर्गत सर्व्ह सुरू आहेत.(Mahayuti Internal survey in maharashtra) अशातच महायुतीने विदर्भात केलेल्या अंतर्गत सर्वेची माहिती समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात ६२ पैकी महायुतीला फक्त २५ जागा मिळत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. (Mahayuti to get 25 seats says its own survey) त्यामुळे हा सर्वे भाजपची डोकेदुखी वाढवणारा आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी दौरे, बैठका, संवाद बैठका सुरू आहेत. पण महायुतीने विदर्भात केलेल्या सर्वेमुळे भाजपची चांगलीच झोप उडाली आहे.
महायुतीने केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार आहे. विदर्भात भाजपला १८ जागा, शिंदे गटाला ५ जागा व अजित पवार गटाला फक्त २ जागा मिळणार असल्याचे या सर्वेक्षणातून दिसत आहे.(mahayuti survey says 18 seats to bjp, 5 ajit pawar and 2 shinde sena) धक्कादायक म्हणजे नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त ४ जागा मिळत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.(only 4 seats to bjp in Nagpur district)
एकीकडे विदर्भात महायुतीचे नुकसान होत असतानाच दुसरीकडे महायुतीतल जागावाटपाचा तिढाही अद्याप कायम आहेत. यावरूनही महायुतीतल मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एका माहितीनुसार, जवळपास चाळीस मतदारसंघात महायुतीत जागावाटपाचा तिढा वाढण्य़ाची शक्यता आहे. या मतदारसंघांसाठी तीनही पक्षांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. यासोबतच गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी झालेल्या बैठकीतही वाद निर्माण होणाऱ्या मतदारसंघांचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याच्या सुचनाही अमित शाहांनी दिल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात या मतदारसंघांवर तोडगा निघण्याची शक्यता आहेत.