Saturday, January 11, 2025

Latest Posts

माढा पाठोपाठ धाराशिवमध्ये ही भाजपला मोठा धक्का

| TOR News Network | Dharashiv Lok Sabha Latest News : लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षांतर सुरु आहे.मात्र या सर्व धामधूमीत काही नेते आपल्या स्वगृही परतत आहे.याच श्रृंखलेत आता धाराशिमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.(Big Shock to Bjp in Dharashiv) निवडणुकीआधीच भाजपमध्ये गेलेले व दोन टर्म खासदार राहिलेले ठाकरे गटाचे बडे नेते पुन्हा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतत आहेत. (Dharashiv Bjp Leader to left party)

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. सध्या असलेल्या पक्षावर नाराजी असल्यास अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत. धाराशिवचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव बापू कांबळे यांचा शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे,(shivaji bapu kamble to left bjp) अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीये. कैलास पाटील यांच्या नेतृत्वात शिवाजीराव कांबळे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.(Shivaji bapu kamble to join uddhav thakeray shivsena)

भोकर येथे उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिवाजीराव बापू कांबळे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. शिवाजीराव बापू कांबळे हे यापूर्वी शिवसेनेकडून २ टर्म खासदार राहिले आहेत.(He was Mp for 2 term from shivsena) त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 10 वर्षे राज्य कार्यकारिणीवर त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर आता ते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

माढ्यात ही भाजपला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर भाजपला माढामधून देखील मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते. मात्र भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी राजीनामा दिला आणि शरद पवार गटाची साथ दिली.(Dhairyasheel Mohite Patil Was Big Shock to Bjp) त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या रिंगणात आहेत.(Dhairyasheel Mohite Patil From Madha Lok Sabha)

Latest Posts

Don't Miss