Thursday, January 16, 2025

Latest Posts

भाजपला मोठा धक्का ; विधानसभेच्या तोंडावरच हिना गावितांनी ठोकला राम राम

| TOR News Network |

Heena Gavit Latest News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. (big Shock to bjp in nandurbar) भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. (Heena Gavit left BJP) अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत.(Heena gavit to contest independent) अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.(Heena gavit on shinde shivsena) मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार, मी निवडणूक लढत जिंकणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे. शिंदे गट वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात उमेदवारी करत आहे, असे हिना गावित यांनी सांगितले आहे. (heena gavit blame shinde sena)हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसलाय.

हिना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या.(2014 youngest mp heena gavit) त्यावेळी हिना गावित या 26 वर्षांच्या होत्या. हिना गावित यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. पंतप्रधान मोदी यांनीही हिना गावित यांचे कौतुक केले होते.

Latest Posts

Don't Miss