Monday, January 13, 2025

Latest Posts

त्या घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा

| TOR News Network | Eknath khadse Latest News : पिंपरी-चिंचवडमधील कथित भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळाप्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला कोर्टानं नियमित जामीन मंजूर केला आहे. (Big relief to Eknath khadse)

एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी या तिघांना नोव्हेंबर २०२३ मध्ये हायकोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता त्यांना नियमित स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.(Regular Bail Granted To Khadse Family) त्यामुळं खडसे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता. (Bhosari Land case) बाजारभावापेक्षा अगदी कमी किंमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासानंतर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलं होतं.

Latest Posts

Don't Miss