Saturday, January 11, 2025

Latest Posts

केजरीवाल यांना मोठा दिलासा ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

| TOR News Network |

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला आहे.(Sc Bail to Arvind Kejriwal ) दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना हा दिलासा मिळाला आहे. तब्बल 177 दिवसांपासून केजरीवाल दिल्लीतील तुरुंगात बाहेर येणार आहेत.(After 177 days kejriwal will come out of jail)

आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांची 10 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिलंय. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, केजरीवाल या खटल्यातील गुण-दोषांवर सार्वजनिक भाष्य करणार नाहीत. ईडी प्रकरणात लादण्यात आलेल्या अटी या प्रकरणातही लागू असणार आहेत.

आम आदमी पक्षाच्या (आप) संयोजकांनी कथित अबकारी धोरण प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) कडून जामीन रद्द करण्याची आणि अटक करण्याची मागणी केली होती.(Cbi Ask to cancel bail of kejriwal) केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. एक जामीन नाकारल्याविरुद्ध आणि दुसरी भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान देणारी. सीबीआयने 26 जून 2024 रोजी केजरीवाल यांना अटक केली. त्याच्यावर साक्षीदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप आहे.

Latest Posts

Don't Miss