Monday, November 18, 2024

Latest Posts

गळती थांबेना, काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला

| TOR News Network | Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेली गळती कमी होण्याचं नाव घेत नाही. गडचिरोलीतील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे.(Congress leader Nitin Kodwate to Join BJP)

गडचिरोलीतील काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. नितीन कोडवते यांच्याकडे सध्या काँग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी होती.(Congress State Secretary Nitin Kodwate Resign) आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार होत्या.

बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

डॉ.नितीन कोडवते यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात करणार प्रवेश करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश होत आहे. गुरुवारीच काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडवते स्पर्धेत होते. परंतु या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही.

यांना मिळाले तिकीट

सात जागांवर सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुणे लोकसभा मतदार संघातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून वळवंत वानखेडे, लातूरमधून डॉ. शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परंतु काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

Latest Posts

Don't Miss