Monday, January 13, 2025

Latest Posts

मोठा गौप्यस्फोट : राष्ट्रवादी फोडण्यास शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला 

Theonlinereporter.com – May 7, 2024

Big Claim About Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनील शेळके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. (Ncp Mla Sunil Shelke Big Statement on sharad pawar)  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा पडद्यामागे नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या होत्या, (What happens behind when ncp breaks) याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.  शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. हे अवघ्या काही तासात झाले नाही, यामागे दोन महिन्यांचा प्लॅन होता. (it was 2 month plan before ncp break) “शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला, (Sharad pawar green signal to break ncp) तुम्ही पुढे जा… माझा राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले होते असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला.(Mla sunil shelke big claim)

“शरद पवार काही बोलले तरी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या बोलण्याचं आम्हाला वाईट वाटत नाही. रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना बोलण्यास भाग पाडतात. शरद पवारांच्या मनात आमच्याबद्दल विष पेरण्याचं काम केलं आहे”, असा मोठा दावा सुनीळ शेळके यांनी केला.

“2 जुलै 2023 ला सकाळी देवगिरीवर गेलो आणि दुपारी शपथविधी झाला. यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. (Sharad Pawar,ajit pawar seprate on 2 july 2023) हे अवघ्या काही तासात झाले नाही, यामागे दोन महिन्यांचा प्लॅन होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा होता तो घेतला. या घडामोडींच्या सुप्रिया सुळे यादेखील साक्षीदार होत्या”, (Supriya sule know about ncp break strategy)असं सुनील शेळके म्हणाले.

याबाबत शरद पवारांसोबत चर्चा

“अजित पवारांना विनाकारण व्हिलन केलं जातंय. साहेबांची अजित पवारांनी साथ सोडली याचा माहोल केला जातोय. अजित पवार यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे. (ajit pawar should talk on it) 2 जुलै 2023 च्या शपथीविधी विषयी बोलायला हवं. राष्ट्रवादीला कुठली पदं मिळणार, लोकसभेला किती जागा मिळणार याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्या होत्या”, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला.

हे केवळ सुप्रिया सुळे सांगू शकतात

“शरद पवार यांनी राजीनामा दिला तो मागे घेण्यासाठी काही जणांनी भाग पाडले. अजित पवारांना रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे लक्ष्य करत आहेत. यामागे त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला, तुम्ही पुढे जा… माझा राजीनामा देतो. त्यानंतर शरद पवार यांना राजीनामा मागे का घ्यावा लागला? हे केवळ सुप्रिया सुळे सांगू शकतात. शरद पवार यांना पुढे करून ही निवडणूक लढत आहेत”, असं सुनील शेळके म्हणाले.(keeping sharad pawar ahed for loksabha) 

वडिलांचं नात जोडून भावनिक आवाहन 

“अजित पवारांनी बंडखोरी केली, अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. हे जे काही दाखवत आहेत यावर पवार कुटुंब टिकावं म्हणून अजित पवार गप्प आहेत. वडिलांचं नात जोडून सुप्रिया सुळे भावनिक आवाहन करत आहेत. (Supriya sule Emotional appeal) अजित पवारांना विरोध करणाऱ्यात सुनील शेळकेही होते, पण ते आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना पाहतो आहोत”, असा दावा सुनील शेळके यांनी केला. (we see ajit pawar as cm of state)

Latest Posts

Don't Miss