Thursday, January 16, 2025

Latest Posts

महायुतीमधील ९ मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. अद्याप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नसली तर राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे.(Vidhansabha Election 2024 ) लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक दिग्गज नेते आता पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत. (Bjp Leaders likely to join Sharad Pawar NCP) अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणार कागलचे समरजित घाटगे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच तुतारी हाती घेतली. (samarji Ghatge Patil Join Sharad Pawar NCP )

 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल,त्याच पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.(Mahayuti ticket formula) पण या फॉर्म्यल्यामुळे अनेक इच्छुकांच्या नाराजीलाही महायुतीतील पक्षनेतृत्त्वाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरल्याचीही बातमी समोर आली आहे.

 

पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले, कागलचे समरजित घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पडग्यामागे चर्चाही सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच कागलच्या समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणाच्या तयारीत असून ते कोणत्याही क्षणी भाजप सोडून तुतारी हाती घेऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

पुण्यातील वडगाव शेरीचेय माजी आमदार आणि भाजप नेते बापू पठारेंची काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे पुण्याचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठींब्यावर निवडणून आलेले आमदार दीपक चव्हाण हेदेखील केव्हाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेच्या शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून निश्चित मानली जात आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील हेदेखील शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात.अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे.माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्याही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्याशी गाठी-भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे शिंदे हे देखील शरद पवाराकडे जाण्याची शक्यता आहे.विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हेदेखील कधीही हातात तुतारी घेऊ शकतात. तसे झाल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss