सध्या देशात महादेव या ऑनलाइन बेटिंग अॅपची चर्चा जोरावर आहे. त्यावरुन देशात राजकारणही चांगलेच तापले आहे. (Bhupesh Baghel Yaana BJP Madhe Devacha Sthan) छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. यावरच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.(MP sanjay raut Speaks on Mahadev Betting App)
छत्तीसगमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. सध्या य़ेथे काॅग्रेसची सत्ता असून भूपेश बघेल हे मुख्यमंत्री आहेत. या सर्व पाश्वभूमीवर बघेल यांचे नाव महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी जोडून सरकारला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे आरोप काॅग्रॆसचे वरिष्ठ नेते करत आहेत.महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांनी ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीने केला आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.त्यांनी महादेव अॅपचा थेट संबंध भाजपाशी जोडला आहे.राऊत म्हणाले नुकतंच मोदी आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट बिरसा विमानतळावर झाली. पटेल यांनी मोदी यांचे स्वागत केले.हे तेच पटेल आहेत ज्यांच्यावर मोदी यांनी इकबाल मिर्ची सोबतचे संबंध जोडले होते.आज मोदी आणि पटेल हातात हात घेत चालत असून ही सर्व महादेव अॅपची कमाल आहे.भूपेश बघेत यांच्यावरील ईडीच्या आरोपा बद्दल बोलताना राऊत म्हणाले भूपेश बघेल जर महादेव अॅप बद्दल ईडीने केलेल्या आरोपा मुळे भाजपात गेले किंवा त्यांनी भाजपाला मदत केली तर भाजप त्यांना देवाचं स्थान देईल यात शंका नाही.हे लोकं मग या अॅपचं हररह महादेव अॅप करतील असे ही राऊत म्हणाले.राऊत यांनी महाराष्ट्राचं उदाहरण देत अजित पवार,हसन मुश्रीफ,छगन भुजबळ हे देखील महादेव अॅपचे सदस्य झाल्याचेही नमुद केले.