| TOR News Network |
Sanjay Raut Latest News : भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेते होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते अजित पवार गटासोबत आहेत.(Sanjay Raut On Chaggan Bhujbal) आता त्यांचं शिवसेनेशी काहीही नातं नाही. भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते, मोठे नेते होते. (Sanjay raut On bhujbal in Shivsena) पण ते या पक्षात नाहीत. ते जर कोणत्याही पक्षात टिकून राहिले असते, भले तो कोणताही पक्ष असो शिवसेना किंवा इतर कोणताही पक्ष तर ते जरूर मुख्यमंत्री बनले असते असं संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut on bhujbal As Cm)
आधी लोकसभेची आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.त्यांची ठाकरे गटाशी चर्चा सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत. (Political Confusion About bhujbal) मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे आता जर कोणी अशा अफवा पसरवत असतील की भुजबळ आणि ठाकरे गटात काही चर्चा सुरू आहे. तर ते चुकीचं आहे. असं काहीही नाहीये. आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेचं सगळं उत्तम सुरु आहे आणि आम्हाला वातावरण बिघडवायचं नाहीये, असंही राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा पटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता जोमाने कामाला लागले असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. ब्लू प्रिंटही त्यांनी तयार केली आहे. याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर राऊत यांनी खोचक टोला लगावला. पहिले त्यांचा डबल इंजिन वाला पक्ष होता,मग ट्रिपल इंजिनचा झाला. त्यानंतर राज ठाकरे यांना सोबत घेतल्यावर चौथ इंजिन लागलं.(Sanjay Raut on raj thackeray) पण त्यांची ही सर्व इंजिनं बंद पाडून महाविकास आघाडी पुढे निघून गेली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आम्हीच विजयी होणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तुम्ही महायुतीला आणखी कितीही इंजिन जोडलीत तरी आमचाच विजय होणार.(Sanjay Raut On vidhansabha)
पावणेदोनशे पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.त्यावरही राऊत यांनी टोला हाणला.(Sanjay Raut On Fadnavis) त्यांनी महाराष्ट्रात साधारण 350 जागा जिंकाव्यात. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 400 चा पार नारा दिला होता, पण तो काही त्यांना पूर्ण करता आलेला नाही. तो फडणवीसांनी महाराष्ट्रात पूर्ण करावा. जरी महाराष्ट्रात 288 जागा असल्या तरी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात 400 (जागा) पार कराव्यात, असा खोचक टोमणा राऊत यांनी लगावला.