Saturday, January 11, 2025

Latest Posts

मराठा आरक्षणानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ अॅक्शन मोडवर

सर्वपक्षीय, संघटनांच्या दलित-ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक

Chhagan Bhujbal Statement After Maratha Reservation : मराठा आरक्षणविषयक मागण्या राज्य शासनानं मान्य केल्यानंतर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Bhujbal in action mode) त्यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना आता आम्ही लोखोंच्या संखेत मैदानात उतरणार असल्याचे म्हणटले आहे.(Chhagan Bhujbal called meeting after CM Eknath Shinde statement in vashi)

मराठा आरक्षणविषयक मागण्या राज्य शासनानं मान्य केल्यानंतर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्या आपल्या सिद्धटेक या बंगल्यावर सर्व पक्षीय दलित-ओबीसी नेत्यांना सर्व अभिनेवेश बाजुला ठेऊन उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.(Bhujbal appeal all obc leader for meeting)

भुजबळ म्हणाले, “उद्या संध्याकाळी ५ वाजता सरकारी निवासस्थानी दलित, ओबीसी नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षाचे संघटनेचे असतील, नसतील त्यांनी अभिनिवेश सोडून सिद्धगड बंगला इथ यावं, आपण यावर चर्चा करुयात. यामध्ये कुणालाही कमी लेखण्याचा प्रश्न नाही. चर्चा करुयात यावर पुढे काय पावलं उचलायची ते ठरवू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ” असे भुजबळ म्हणाले.

मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही

मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु, मला तसं काही वाटत नाही. (I dont Think Maratha samaj Won Says bhujbal) अशा रितीने झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येत नाहीत. आम्हीही मंत्रिपदाची शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करू आणि निर्णय घेऊ, कोणाच्याही बाजूने निर्णय घेणार नाही, असं म्हटलं होतं. आम्ही सर्व मंत्रिमंडळाने तशी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या एक अधिसूचना काढली आहे. याचं नंतर कायद्यात रुपांतर होईल. तत्पूर्वी १६ फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजांमधील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी या निर्णयावरील हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं मी आवाहन करतो. लाखोंच्या संख्येने या हरकती पाठवाव्या. आम्ही लाखोंच्या संख्यने सरकारला अशा हरकती पाठवू. ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हरकती पाठवाव्या. जेणेकरून सरकारला कळेल की याची दुसरी बाजूदेखील आहे. इतरांचं काहीतरी मत आहे. नुसतं एकमेकांवर ढकलून, चर्चा करून काहीही होणार नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागेल.

Latest Posts

Don't Miss