| TOR News Network |
Bhaskar Jadhav Latest News : रामटेक विधानसभा मतदारसंघ (Ramtek Assembly Constituency News) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. (Bhaskar Jadhav Slams Congress)
भास्कर जाधव म्हणाले की, रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केलीय, याची मला वेदना होतेय. काँग्रेसची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई करायला हवी.(bhaskar jadhav on rajendra mulak) काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीमागे इथल्या काँग्रेस नेत्याचा हात आहे, असा आरोप त्यांनी सुनील केदार यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.
पूर्व विदर्भात फक्त एक जागा आम्हाला मिळाली, त्या जागेवर काँग्रेसने बंडखोरी केलीय. आजपर्यंत बंडखोर जिल्हाध्यक्षांवर काँग्रेसने कारवाई केली नाही, हे वेदनादायी आहे. रामटेक लोकसभा आम्ही काँग्रेसला दिली, पण त्याचं फळ आमच्या पदरात हे पडणार असेल तर हे वेदनादायक आहे. यामुळे तरुण कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. बंडखोरीचा विषय आमच्या पक्षाने गांभीर्याने घ्यावा. आघाडीत असं वर्तन योग्य नाही. काँग्रेसकडून अशा प्रकारचं वर्तन नेहमी होतंय.(bhaskar jadhav blame on congress) आमचा उमेदवार निवडून येईल. पण मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं योग्य नाही, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केलाय.