Thursday, January 16, 2025

Latest Posts

एक्झिट पोलचा इतिहास माहित आहे का ? History Of Exit Poll

भारतात केव्हा झाला होता पहिला एक्झिट पोल

History Of Exit Poll : देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूकांत कोणत्या पक्षाचे सरकार येणार याची उत्सुकता सर्वांना आहे. पाच राज्यातील मतदान अर्थात मतदारांचा कौल मतदान पेटीत बंद झाले आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांना कल जाणल्या जातो. त्यानंतर एक्झिट पोल जारी होतो. सर्वसामान्य जनतेबरोबर राजकीय पक्ष देखील या एक्झिट पोलवर लक्ष ठेवून असतात.(When Was First Exit Poll Held In India) चला तर पाहूया एक्झिट पोलची परंपरा केव्हापासून सुरु झाली ?

नव्वदच्या दशकात आपल्याकडे खाजगी वाहिन्यांचे पेव फुटले आणि निवडणूकांचे वार्तांकनाचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण सुरु झाले. त्यानंतर एक्झिट पोलचा दौर सुरु झाला. आता तर प्रत्येक मिडीया हाऊसचा स्वतंत्र एक्झिट पोल जारी होऊ लागला आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ( सीएसडीएस ) या संस्थेने 1960 मध्ये एक्झिट पोल्सचा आराखडा सादर केला होता. मतदान झाल्यानंतर जनतेचा कल पाहून निकाल लागण्यापूर्वी त्याचा अंदाज काढला गेला होता. या प्रक्रीयेस एक्झिट पोल असे नाव देण्यात आले होते. या निवडणूक निकाल पूर्व अंदाजांना आता लोक गांभीर्याने घेत आहेत. राजकीय पक्ष देखील त्याकडे लक्ष ठेवून असतात. मात्र सुरुवातीला मात्र त्याकडे कोणी शास्र म्हणून  पाहायला तयार नव्हते.

भारतात केव्हा पासून सुरु झाली प्रथा ?

भारतात पहिला एक्झिट पोल साल 1996 मध्ये जारी झाला होता. या वर्षी लोकसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. या एक्झिट पोलला सीएसडीएसने संस्थेनेच तयार केले होते. या एक्झिट पोलमध्ये देशात खंडीत जनादेश येऊ शकतो असा निष्कर्ष निघाला होता. त्यावेळी एक्झिट पोलचे हे तंत्र लोकांसाठी खूपच नवे होते. त्यामुळे त्याच्यावर खूपच निवडक लोकांना विश्वास होता.

अंदाज खरा निघाला कि खोटा ?

जेव्हा सर्वसाधारण निवडणूकांचा निकाल आला, तेव्हा सर्वजण आर्श्चचकीत झाले. कारण हा एक्झिट पोल जवळपास खरा निघाला होता. 1996 च्या लोकसभा निवडणूकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, परंतू बहुताचा आकडा काही गाठू शकली नाही. त्यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान बनले. परंतू ते बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने 13 दिवसाचं हे सरकार कोसळलं.

Latest Posts

Don't Miss