Sunday, January 12, 2025

Latest Posts

भारतीय नौदलाच्या निवृत्त आठ अधिकाऱ्यांसाठी का दिला फाशीचा निर्णय

काय आहे प्रकरण,काय म्हणाले भारत सरकार

कतारच्या अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांना फाशी (Execution Dicussion for 8 indian retired navy officer in Qatar) देण्याचा निर्णय कतारच्या न्यायालयाने दिल्याची महिती समोर आली आहे.या आठही भारतीयांना कशासाठी फाशी दिली जात असून यावर भारत सरकारचे काय म्हणने आहे.

भारतीय नौदलाचे आठ निवृत्त अधिकारी गेल्या वर्षांपासून कतारच्या तुरुंगात आहेत.कतारमध्ये अटकेत असलेले ८ भारतीय हे कतार येथील झाहिरा अल आलमी नावाच्या कंपनीत काम करत होते.ही कंपनी कतार नौदलासाठी पाणबुडी संदर्भात काम करते.या कंपनीत ७५ भारतीय नागरिक कामाला आहेत.मात्र त्यापैकी आठ भारतीयांवर कतारच्या न्यायालयाने काही आरोप ठेवत त्यांना फाशी देण्याचे भारताला कळाले आहे.त्यामुळे भारतानेही कतारला संपर्क साधत संवाद साधला आहे.या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फाशीच्या निर्णयामुळे धक्का बसल्याचे म्हणटंल आहे.तसेच भारत कायदेविषयक चमूच्या संपर्कात आहे.या विषयी जास्त भाष्य करणे भारताने टाळले आहे.एका रिपोर्ट नुसार अटकेत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी इस्रायलला संवेदनशील माहिती दिली हाती.त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे.पाणबुड्या खरेदी करण्यासंदर्भात गुप्तचर माहिती लिक करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या या माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारवर दबाव होता.मात्र आता फाशीच्या शिक्षा झाल्याचे समोर आल्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले आहे. 

Latest Posts

Don't Miss