Saturday, January 11, 2025

Latest Posts

मी Sharad Pawar साहेबांचाही चेला – Sanjay Raut

खासदार संजय राऊत यांचे नागपूरात तुफानी भाषण

MP Sanjay Raut in Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा आमदार रोहित पवार यांनी राज्यभर युवा संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेचा आजचा (12 डिसेंबर) शेवट दिवस. यानिमित्ताने नागपुरात आज युवा संघर्ष यात्रा सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार, संजय राऊत, दिग्विजय सिंग यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुफानी भाषण केलं.

संजय राऊत म्हणाले, ही मर्दांची सभा आहे. ही लढणाऱ्यांची आणि संघर्ष करणाऱ्यांची सभा आहे. ही पळपुट्यांची सभा नाही. आम्ही लढू, आम्ही संघर्ष करू आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणू. दिग्विजय सिंग आले आहेत. आम्हाला वाटलं होतं ते मध्य प्रदेशातून विजयाची वार्ता घेऊन येतील. परंतु दुर्दैवाने मध्य प्रदेशची हवा आम्हाला कळली नाही. मध्य प्रदेशची हवा या महाराष्ट्राला लागणार नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो.

“तुमचे नरेंद्र मोदी देशभरात गॅरंटी द्यायला फिरत आहेत. पण ही सभा गॅरंटी देते २०२४ ला तुम्ही सत्तेवर येत नाही. २०२४ मध्ये फडणवीस तुम्ही सत्तेत नसाल ही आमची गॅरंटी. या राज्यात एक फूल आणि दोन डाऊट फूल आहेत. यांच्यात फूल कोणीच नाही. यात फूल कोणी असतील ते तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार. या दोघांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात आणि देशात क्रांती करायची आहे. आमची संघर्ष करायची तयारी आहे. अनिल बाबू आमचे जेलमधील मित्र आहेत आणि जेलमधील मैत्री पक्की असते. संघर्ष करणाऱ्यांची पैकी मित्र असते. आम्ही झुकलो नाही, वाकलो नाही आणि थिजलो नाही. या अंगावर”, असं आव्हानही त्यांनी दिलं.

ते पुढे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आणि मी पवार साहेबांचाही चेला आहे. (I am Chela Of Sharad Pawar Says Sanjay Raut In Yuva Sangharsha Samapt Yatra In Nagpur) याला म्हणतात डबल इंजिन. रोहित पवार ८०० किमी चाललात. १० वर्षांपासून देश थांबलेला आहे म्हणून आपल्याला चालावं लागतं. हा देश १० वर्षांपासून एका डबक्यामध्ये थांबवला गेला आहे. देशातील शेतकरी, तरुण, महिला नाराज आहेत. या देशात सुखी कोणी नाही मग सरकार कशाकरता चालवत आहेत?

Latest Posts

Don't Miss