Saturday, January 11, 2025

Latest Posts

अपघातापूर्वी त्यांनी व्हिस्कीचे १२ पेग रिचवले

| TOR News Network |

Worli Hit And Run Case : सध्या राज्यात हिट अँन्ड रनच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सरकारने यासाठी नवे कायदे आणि नियम केले असले तरी बार मध्ये त्या नियमांना केराची टोपली दाखवल्या जात आहे. नुकतेच वरळी हिट अँड रन प्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. रविवारी पहाटे झालेल्या अपघातात बीएमडब्ल्यू गाडीखाली चिरडली गेल्याने कावेरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Mumbai BMW car Accident Case) मात्र त्यानंतर मुख्य आरोपी मिहीर शाह हा दोन दिवस फरार होता.(Mihir Shah BMW Accident case Mumbai) अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यासह त्याचे मित्र, आई-बहीणही पोलिसांच्या ताब्यात आहेत.(Mihir Shah in police custody)

पोलिसांनी मिहीरला कोर्टासमोर हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.(Mihir Shah police custody till 16 july) या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता मिहीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीने अपघातानंतर कारची नंबरप्लेट कुठे टाकली? तसेच कोणाकोणाला संपर्क केला? (Mihir Shah Car Number plate)त्याला नेमकी कोणी , कशी मदत केली, या सर्व प्रश्नांची उत्तर आता मिहीरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान आता या अपघाताप्रकरणी आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे हा अपघात होण्यापूर्वी मिहीर व त्याचे मित्र जुहूमधील बारमध्ये पार्टी करत होते.(mihir shah party at juhu bar) त्याच बारमध्ये त्यांनी व्हिस्कीचे १२ पेग रिचवल्याचे समोर आले आहे. (mihir shah drunk) अपघाताच्या 4 तास आधी मिहीर शहा आणि मित्रांनी विस्कीचे १२ पेग प्यायल्याची माहिती उघड झाली आहे.(mihir shah and friends drunk 12 peg whiskey)  मात्र आरोपी मिहीर शाह याला २५ वर्षे पूर्ण झालेली नसतानाही त्याला व्हिस्की देण्यात आली होती, म्हणूनच या बारवर कारवाई करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर काल मुंबई महानगरपालिकेने बारवर तोडक कारवाई केली.

मुंबईमधील वरळी येथे रविवारी पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांना बीएमडब्ल्यूने फरफटत नेलं. (kaveri nakhwa died in hit and run case) प्रदीप नाखवा यांनी सांगितल्यानुसार कावेरी यांनी सी लिंक पर्यंक फरफटत नेलं. त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले होते. उपचारादरम्यान कावेरी यांचा मृत्यू झाला. वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहत होते.

मिहिर शाह हा कार चालवत होता. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी चालक ड्रायवर राजेंद्र सिंग बिडावत आणि वडील राजेश शाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र सोमवारी राजेश यांना जामीन मिळाला. अपघाताच्या दोन दिवसांनंतर अखेर फरार आरोपी मिहीर शाह याला व त्याच्यासह १२ जणांना अटक करण्यात आली.(Mihir Shah arrested)

Latest Posts

Don't Miss