Sunday, January 12, 2025

Latest Posts

तर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार नाही

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : बीसीसीआयने दिले स्पष्ट संकेत

ICC Champions Trophy 2025 News: क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक नुकताच  आटोपला. या स्पर्धेतील सर्वोतम पहिले आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पात्र ठरले आहे. आता आयसीसीने फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ९ व्या आवृत्तीचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवले आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तान खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.(BCCI Refuse to Play ICC Champions Trophy 2025 To Play in Pakistan ) काय आहे संपूर्ण प्रकरण व कारण…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची शिफारस केल्याची माहिती समोर येत आहे. जर आयसीसीने याला मंजुरी दिली असेल तर पीसीबीने भारताच्या या मालिकेतील सहभागाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “यावेळीही भारतीय संघाने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आयसीसीने पीसीबीला नुकसान भरपाई द्यावी. भारत जर पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी आला नाही तर आम्ही देखील त्याच्याबरोबर खेळणार नाही,” असे पाकिस्तानने आयसीसीला स्पष्ट शब्दात सांगितल्याचे कळते.तर २०२५ मध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आशिया चषक हायब्रीड मॉडेलवर होऊ शकते. त्यावेळी १७ पैकी ४ सामने पाकिस्तान आणि १३ सामने श्रीलंकेत खेळले गेले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असेच काही घडू शकते. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतले जाऊ शकते किंवा ते हायब्रीड मॉडेलवर आयोजित केले जाऊ शकते.तर क्रिकबझच्या आलेल्या माहितीनुसार, यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. जर पाकिस्तानने यावर आक्षेप नोंदवला तर त्याला आशिया चषक सारख्या हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करावे लागेल. वास्तविक, बीसीसीआय आपला संघ पाकिस्तानला पाठवायला तयार नाही. आशिया चषकातही त्याने अशीच कामगिरी केली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम आहे. अशा परिस्थितीत पीसीबीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Latest Posts

Don't Miss