Sunday, January 12, 2025

Latest Posts

पुण्यातील अपघातात दोन जणांचा जीव घेणाऱ्याला लगेच जामीन

Theonlinereporter.com – May 20, 2024 

Pune Accident Case : पुण्यातील कोरोगाव पार्क येथे भरधाव वाहन चालवत एक श्रीमंताच्या मुलाने पोर्श या स्पोर्ट्स कारने दुचाकीली जोरदार धडक दिला, (Koregaon park accident) यात दोन जणांचा जीव गेला. (two killed in koregaon accident) या प्रकरणात पोलिसांनी त्या मुलाल अटक केली. मात्र त्याला लगेच जामान देखाल मिळाला. वेदांत अग्रवाल असे त्या मुलाचे नाव आहे. (Bail to boy who killed 2 in pune accident)

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याला जामीन मंजुर झाला आहे. (Bail to vedant agrawal) बड्या उद्योजकाच मुलगा असलेला वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा  घडलेला अपघात इतका भीषण होता की जागीच दोघांचा मृत्यू झाला. (pune koregaon accident) ज्या अटींवर त्याला जामीन दिला आहे त्या अटींमध्ये 15 दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत वाहतूक नियंत्रण करावं लागणार आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथून टू-व्हीलवर जाणाऱ्या एका कपलला पोर्श स्पोर्ट्स कारने जोरात धडक दिली. (porsche car accident in pune) ही धडक इतकी जोरात होती की तरूणी गाडीवरून 10 फूट हवेत उडाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चावणाऱ्या तरूणाने उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. दोघेही राजस्थानचे असून अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (Anis Dudhiya and Ashwini Costa killed in accident in pune) या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.(Vedant punished for traffic rules monitor) वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत. वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार या अटींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे.

या अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Koregaon accident video viral) स्पोर्ट्स कार तब्बल 200 च्या स्पीडने असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं सांगितलं. रात्री  बारमध्ये पार्टी करून त्या अल्पवयीन मुलाच्या कारने  तरुण-तरुणीच्या दुचाकीला धडक दिली होती. या बारमधून अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Latest Posts

Don't Miss