Saturday, January 11, 2025

Latest Posts

लाडकी बहीण योजना विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन – मुख्यमंत्री

| TOR News Network |

Eknath Shinde On Badlapur Case : बदलापूरच्या घटनेने अवघे राज्य सुन्न झाले आहे. दोन चिमुकलीवर शाळेमध्ये लैगिंक अत्याचारामुळे संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमध्ये स्थानिकांनी आंदोलन करुन 9 तास रेल रोको केला होता. या आंदोलनावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला केलाय.(Cm Shinde On Badlapur Andolan) हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.

मुख्यमंत्री साताऱ्याचा दौरावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.(Cm Shinde Slams Opposition) मुख्यमंत्री म्हणाले की, ‘बदलापूरमधील घटना निंदनीय आहे. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे याचे आदेश मी दिले आहेत. आरोपीला अटक झाली असून त्यावर कठोरातील कठोर कलम जसे की, बलात्कार, पोक्सो कलम लावण्याचा आदेश देण्यात आलेय. तसंच ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात येणार आहे. एक स्पेशल PP ची नियुक्ती करण्यात आलीय. शिवाय SIT देखील नेमली आहे.'(Cm Shinde Order for SIT On Badlapur Case)

‘शिवाय त्या चिमुकलींसह कायम महिला अधिकारी संवाद साधली, असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात दंरगाई केली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबण्याची कारवाई करण्यात आलीय. संपूर्णपणे त्या कुटुंबाच्या मागे सरकार आहे. त्या कुटुंबाला जे जे काही सहकार्य करायचे आहे, ते केलं जाणार आहे. दरम्यान भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून नियमाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.’

यावेळी त्यांनी बदलापूर रेल रोको आंदोलनावरुन विरोधकांवर ताशेरे ओढले. बदलापुरात झालेलं आंदोलन राजकीय दृष्या प्रेरित असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय.. 8-9 तास आंदोलन सुरू होतं त्याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय. (Opposition)Behind Badlapur Andolan)स्थानिक कमी होते आणि इतर ठिकाणावरून गाडी भरूल लोकं आंदोलनासाठी आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय.. सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.. तर आंदोलन ठिकाणी लाडकी बहीण कार्यक्रमाचे पोस्टर घेऊन आले असल्याचा आरोपही त्यांनी केलंय.

‘चिमुकलीवर अत्याचार झाला त्यावरुन आंदोलन केलं. ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांना लाज वाटली पाहिजे. आंदोलन करण्यासाठी अनेक विषय असताना अशा दुदैवी घटनेवरुन आंदोनल करणे, खरंच संतापजनक आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर संतापले आहेत. आंदोलनात लाडकी बहीण योजना नको, बहीण सुरक्षित पाहिजे, असं फलक लगेचच कसे आलेत? लाडकी बहीण योजना हे विरोधकांच्या जिव्हारी लागली आहे, त्यांचा पोटात दुखलंय हे बदलापूरच्या आंदोलनातून दिसून आलं, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Latest Posts

Don't Miss