Monday, January 13, 2025

Latest Posts

या निवडणुकीत धर्म, जात आणि पैशांचा ताकदीने वापर

| TOR News Network |

Bachchu Kadu Latest News : निवडणुका  निस्वार्थ आणि निष्पक्षपणे झाल्या पाहिजेत. त्या होताना दिसत नाही. कुठलाही सत्ताधारी असू दे मग ते भाजपवाले किंवा काँग्रेसवाले, सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर करून घेणे चुकीचं आहे.(Bachchu Kadu on Election Commission) धर्म, जात आणि पैसा या तीन गोष्टींचा अतिशय ताकदीने या निवडणुकीत वापर झाला. लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे पैसे वाटप करून मतदान घेण्याचा प्रकार झाला. (Bachchu Kadu On Lok Sabha Election) ते लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे”, अशी प्रतिक्रिया प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. (Bachchu Kadu on voting Percentage) यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “लोकांची याबद्दल निराशाच असू शकते. मतदान घटण्याची वेगवेगळी कारण असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे निराशा असू शकते”, असं बच्चू कडू म्हणाले. “लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मी त्याचा तेवढा अभ्यास केला नाही. घोडा मैदान जवळ आहे. चार तारखेला सगळं स्पष्ट होईल. (Bachchu Kadu on Lok Sabha Result) तुमच्याकडे सर्वे असतात. अभ्यास असतो. ते तुम्ही दाखवा. आम्ही मत मागणारी लोक आहोत. मत देणारे लोक आहोत. सर्व्हे करणारे तुमच्याकडे असतात. त्यामुळे तुम्हीच सांगा”, असं बच्चू कडू म्हणाले.

“करप्शन एवढं वाढलं आहे की मरण्याची भीती कुणाला राहिली नाही. मरणारा गरीब आणि कामगार आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा बदलला आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. (Bachchu Kadu on pune accident) “घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते. प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहेत. बंधन कशी येणार? कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काहीच पडलं नाही. पैशांच्या भरोशावर मत खेचली जात असतील तर सामान्य माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या मरणाला काही अर्थ नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

Latest Posts

Don't Miss