Thursday, January 16, 2025

Latest Posts

बच्चू कडू बाहेर पडणार : महायुतीला कडक इशारा

| TOR News Network |

Bacchu Kadu Latest News : महायुती व महाविकास आघाडीतील लहान घटक पक्ष विधानसभेपूर्वीच मोर्चेबंधणी करीत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चूल मांडण्याच्या विचारात आहेत. लहान पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी करणार असल्याच्या सुरु आहेत. (Third Front in Maharashtra) अशातच प्रहार संघटनेचे नेते, महायुतीतील आमदार बच्चूु कडू आज महायुतीतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Bacchu kadu to left Mahayuti)

सूत्रांच्या माहिचीनुसार राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Big Shock to Mahayuti)  कारण, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आज (9 ऑगस्ट 2024) बच्चू कडूंचा संभाजीनगरात मोर्चा आहे.(Bacchu kadu Morcha at sambhajinagar) याचवेळी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

बच्चू कडू यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्या महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.(Bacchu Kadu Warning to Mahayuti) आज दुपारी ४ वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास युतीतून बाहेर पडू असं त्यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू हे आपल्याच सरकारविरोधात नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. अमरावतीत त्यांच्या नाराजीचा फटका लोकसभेत दिसला. राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी ही आघाडी आकार घेण्याच्या तयारीत आहे. विधानसभेपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती दिनी त्यांनी मोर्चाचे

Latest Posts

Don't Miss