Thursday, January 16, 2025

Latest Posts

नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडण्यासाठी बच्चू कडूची नवी खेळी

| TOR News Network | Bacchu kadu Latest News : अमरावती लोकसभेत भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेची उमदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या लोकसभा उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. (We will defeat Navneet Rana in election)

इतकंच नाही, तर नवनीत राणा यांच्याविरोधात आम्ही उमेदवार देऊ, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आज शुक्रवारी दुपारी १ वाजता बच्चू कडू जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकारपरिषदेत ते नेमकी काय घोषणा करणार, याकडे महायुतीच्या नेत्यांसह अमरावतीकरांचं लक्ष लागून आहे.(Bacchu Kadu Press Today)

नवनीत राणा यांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मोठी खेळी केली आहे. (Bacchu Kadu Amravati News) सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब आज प्रहार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दिनेश बुब हे प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार, अशी माहिती देखील मिळत आहे.

दिनेश बूब अमरावती लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. (Dinesh Babu to contest Amravati Loksabha) महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळणार, अशी आशा बूब यांना होती. मात्र, ठाकरे गटाने त्यांना तिकीट नाकारलं. त्यामुळे नाराज असलेले दिनेश बूब आज प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.(Prahar janshakti party)

दिनेश बूब यांची अमरावतीमध्ये मोठी ताकद आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्यास नवनीत राणा यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणा यांना पाडता येते का? हे आम्ही पाहणार आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले होते.

Latest Posts

Don't Miss