Saturday, January 18, 2025

Latest Posts

बच्चू कडूंनी घेतली जरांगें पाटलांची भेट म्हणाले..आता मी पण   

भेटी दरम्यान ‘या’ मुद्द्यावर झाली चर्चा : 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन

Bacchu Kadu Meets Jarange Patil : “ज्या लोकांच्या कुणबी नोदीं सापडल्या आहेत, त्यांच्या राज्यांतर्गत सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे”, अशी माहिती बच्चू कडूंनी जरांगे यांच्या भेटीनंतर दिली. (Maratha Reservation Latest News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २० जानेवारीपासून मुंबई आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्य सरकार बॅकफुटवर आलंय. अशातच महायुती सरकारला पाठिंबा देणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगें यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. (Bacchu kadu jarange patil discussion today)

यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. “ज्या लोकांच्या कुणबी नोदीं सापडल्या आहेत, त्यांच्या राज्यांतर्गत सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. त्यासंदर्भात चर्चा करून सरकार पाऊल टाकणार आहे”, अशी माहिती बच्चू कडूंनी जरांगे यांच्या भेटीनंतर दिली.

“कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सग्या सोयऱ्यांना शपथपत्र भरून पुरावा उपलब्ध करून दिल्यास प्रमाणपत्र देण्याचा विचार सुरू आहे”, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

“आंदोलन झाल्यानंतर तोडगा निघत असेल तर तो आंदोलनापूर्वीच झाला पाहिजे. सगे सोयऱ्यांची व्याख्या तयार केली पाहिजे. पाच-सहा व्याख्या तयार झाल्या तर त्या प्रशासकीय बसल्या पाहिजेत. उद्या कोणी कोर्टात जाता कामा नये. हे २० तारखेपर्यंत शक्य आहे का हे चर्चा झाल्यावर कळेल”, असेही कडू यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्याकडून वेळ घेण्यासाठी मी आलो नाही, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. २० तारखेला आंदोलन होणारच असून, मी आंदोलन थांबवण्यासाठी आलो नाही. मी स्वतःच आंदोलनात सहभागी होणार आहे, अशी माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली आहे.(Bacchu kadu will participate in maratha andolan)

 

Latest Posts

Don't Miss