Saturday, January 11, 2025

Latest Posts

ठाकरेंना जय महाराष्ट्र करणारे माजी मंत्री घोलप शिंदे गटात जाणार

| TOR News Network | Babanrao Gholap Latest News : माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांचा साथ सोडली आहे. घोलप शिवसेनेच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेत  प्रवेश करणार आहेत. (Gholap to join Eknath Shinde)

शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदावरून हटवल्याने नाराज बबनराव घोलप नाराज असल्याच्या चर्चा आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. (gholap was intrested from shirdi) मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर ते नाराज (Babanrao Gholap Join Eknath Shinde Group) होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता. (Gholap resigns shivsena)

माजी मंत्री बबन घोलप आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार वाजता पक्षात प्रवेश करणार आहेत. (Gholap to join Shinde shivsena party today) बबन घोलप यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांचीही भेट (Maharashtra Politics) घेतली होती. घोलप हे पाच वेळेला विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी यापूर्वी समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे.

बबनराव घोलप कोण आहेत ?

शिवसेना आणि भाजप युतीच्या सत्तेच्या काळात बबनराव घोलप १९९५ मध्ये कॅबिनेट मंत्री (Lok Sabha Election 2024) होते. त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. देवळाली मतदारसंघाचे बबन घोलप पाच वेळा आमदार राहिले आहेत.सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंय ढवळून निघालं आहे. माजी मंत्री बबन घोलप आज (६ एप्रिल) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं (Maharashtra Lok Sabha 2024) आहे. तसेच बबन घोलप यांचा सर्वात जास्त फायदा आता कुणाला होणार, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Latest Posts

Don't Miss