Saturday, January 18, 2025

Latest Posts

काँग्रेसला धक्का : बाबा आणि झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या गटात ?

Baba Siddique Latest News : लोकसभेपूर्वी राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत.अनेक नेत्यांचे पक्षांतर सुरु झाले आहेत.सध्या मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चर्चा सुरु झाले आहेत. (Big Shock To congress in Mumbai) काँग्रेस नेते माजी मंत्री बाबा सिद्धीकी आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. (Baba And Zeeshan Siddique to left congress)

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता बाबा सिद्धीकी आणि झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.(Baba And Zeeshan Siddique to Enter Ajit Pawar Group) लवकरच त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची माहितीही मिळत आहे. बाबा सिद्धीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार गटाकडून राज्यसभेवर अल्पसंख्यांक चेहरा पाठवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. त्यामुळे अजित पवार गटाकडून राज्यसभेवर जाणारा अल्पसंख्यांक चेहरा बाबा सिद्दीकीच आहेत का? (Baba Siddique will Fight loksabha from NCP )अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसला मुंबईत मोठं खिंडार पडून शकतं. काँग्रेसचा हक्काचं मतदारसंघ हातून जाऊ शकतो.

सध्या तरी मी इतर पक्षात जाण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. जर काही घडत असेल तर मी अधिकृतरित्या सांगेल. मात्र राजकारणात काहीही होई शकतं, असं बाबा सिद्धीकी यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Latest Posts

Don't Miss