Thursday, January 16, 2025

Latest Posts

अयोध्येतील 178 प्रकल्पांवर 30,500 कोटी खर्च करणार योगी सरकार

Ayodhya च्या विकासासाठी उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार अयोध्येच्या विकासासाठी मंजूर असलेल्या 178 प्रकल्पांकरिता जवळपास 30,500 कोटी खर्च करणार आहे. अनेक अरब-मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आक्रमणांमुळे आणि सुमारे ब्रिटीश वसाहतवादाच्या काळात धुसर झालेल्या अयोध्येचे वैभव पुन्हा जिवंत करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशांनुसार, अयोध्येला पुन्हा एकदा अतुलनीय समृद्धी शहरात रुपांतरीत करण्याच्या उद्देशाने आठ संकल्पनांवर आधारित विकास कार्य सुरू आहे. सप्तपुरीस पैकी एक आणि कधीकाळी पृथ्वीची अमरावती अशा नावाने ओलाखल्या जाणाऱ्या अयोध्येची ‘वेद आणि पुराणांसह अनेक धर्मग्रंथांमध्ये स्तुती करण्यात आली आहे. असे म्हटले जाते की अयोध्येतील प्रभू श्री रामाचे जन्मस्थान देवतांनी स्वतः तयार केले होते आणि येथेच महाराजा मनूने पृथ्वीवर मानवांचे जग निर्माण केले. 2014 मध्ये केंद्रात पंतप्रधान मोदी सरकार आणि 2017 मध्ये उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्याने, ब्लू प्रिंटची रूपरेषा तयार करून अयोध्येच्या बहुआयामी विकासाला गती मिळाली. एकापाठोपाठ एक, अयोध्येला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी सुमारे 30,500 कोटी रुपयांचे अंदाजे 178 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. अयोध्येला जागतिक दर्जाच्या शहरात रूपांतरित करण्याची सरकारची वचनबद्धता आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितल्या जात आहे.

Latest Posts

Don't Miss