Sunday, January 12, 2025

Latest Posts

सध्या अजितदादा एका व्यक्तीचंच ऐकतात व सांगेल तसं वागतात व बोलतात

| TOR News Network |

Jayant Patil Latest News : गडचिरोलीत बोलताना अजित पवार यांनी कुटुंबात फूट पडणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं.(Ajit Pawar on Family Dispute) घरात फूट पडली तर लोकांना ते आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले होते. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अजितदादा फक्त एका व्यक्तीचं ऐकतात, ते सांगतील तसंच वागतात व बालतात असं जयंत पाटील म्हणाले.(Jayant Patil on Ajit Pawar)

शरद पवारसाहेबांना सोडून चूक झाल्याचं अजितदादांनी स्वतःहून सांगितलं आहे. सध्याचे अजितदादा अरोरा नावाचे कन्सल्टंट सांगतील तसं बोलतात.(Ajit Pawar Follow Arora consultant) अरोरा या कन्सल्टंट कंपनीने अजितदादांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवण्यास पूर्ण बंदी केली आहे. अजित पवार पहिल्यासारखे बोलत नाहीत. अरोरा नावाचा कन्स्लटन्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात. सल्लागार सांगतात तसे बोलतात. सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न करणं, हे अरोराने दादांमध्ये केलेलं परिवर्तन आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मिळालेल्या महितीनुसार अरोरा कन्सल्टंटला अजित पवार यांचे ब्रँडिंग व प्रमोशन करण्याचे कंत्राट २०० कोटी रुपयात मिळाले आहे.

काल मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक झाली. यात अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव दिल्याची बातमी ‘द हिंदू’ दिली आहे. यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील. त्यांची मागणी करावी अशी पोजिशन आहे, असं ही मला वाटत नाही.(Jayant Patil on Ajit Pawar as CM Face) निवडणुकीपूर्वी अशी मागणी ते करतील असे मला वाटत नाही. कुणीतरी ही खोटी बातमी पसरवली असेल. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे तिथे. अनेकांना तिथे मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

भाग्यश्री आत्राम या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जयंत पाटील यांनी विचारण्यात आलं. (Bhagyashree atram to join Sharad Pawar NCP) तेव्हा शिवस्वराज यात्रा भंडारा, गोंदियात आज असेल. उद्याची नागपूर यात्रा रद्द केली आहे. परवा गडचिरोली अहेरीत यात्रा असेल. अहेरीत गेल्यावर कळेल कोणाला आमच्या पक्षात यायचं आहे आणि कुणाला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.

Latest Posts

Don't Miss