| TOR News Network |
Manorama Khedkar Latest News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. (Manorama Khedkar Arrested) गेल्या अनेक दिवसांपासून त्या फरार होत्या. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते. त्या रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. (Manorama Khedkar Arrested From Raigad Hotel) त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. (Manorama Khedkar in Trap)
शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. अखेर पोसीलांनी त्यांना शिताफिने अटक केली व आता पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.(Manorama Khedkar to present Before court) पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबवून त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे. पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई अन् वडिलांचे कारनामे समोर आले. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेऊन धमकवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.(Manorama Khedkar threatening Farmar bygun) या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Case Register on Manorama khedkar) त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. (Manorama Khedkar Absconded) त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. (Farmer Oppose Manorama Khedkar) त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या.(manorama Khedkar With Bouncer) त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते. वर्षभरापूर्वीच्या या प्रकाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.(Manorama Khedkar Video Goes Viral) त्यानंतर गुन्हा दाखल झाला.
पुणे पोलिसांना अखेर मनोरमा खेडकरला यांचा शोध लागला. पौड पोलिसांच्या पथकाने रायगडमधून त्यांना अटक केली. तसेच पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात 307 हे कलम वाढवण्यात आले आहे. रायगडमधून पोलीस मनोरमा खेडकर हिला घेऊन निघाले आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर फरार झाले होते. (Dilip Khedkar Absconded) त्यांचा शोध सुरु आहे.