Saturday, January 11, 2025

Latest Posts

विधानसभेचे गणित बिघडणार ः राज्यात तिसरी आघाडीसाठी हालचाली सुरु

| TOR News Network |

Third Front In Maharashtra : यंदाची विधानसभा कोणत्याही पक्षासाठी सोपी नाही. त्यामुळे हे लक्षात घेता सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती (Mahayuti Vs Maha Vikas Aaghadi) विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, आता राज्याच्या निवडणुकीत एकीकृत रिपब्लिकन समिती तयारीला लागली आहे. (Ekkikrut Republic Samiti) रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.(Republican Aghadi)  त्यामुळे आता महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे गणित बिघडणार असे बोलल्या जात आहे. (Mahayuti,Mahavikas Aghadi in trouble )

रिपब्लिकन पक्षांमधील (Republican Party) आठवले, गवई, कवाडे गट आता एकसंध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं प्रयत्न सुरू झाले आहेत.(Third Front To Form Soon) चर्चेत भाजपसोबत असलेला आठवलेंचा पक्षही सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.(Athawle To support Third Front)

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.(Republicial to contest vidhansabha) एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं हे प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. नुकतंच नागपुरात त्या संदर्भातील एक प्राथमिक बैठक पार पडली.

विशेष म्हणजे, चर्चेच्या पातळीवर या एकसंघ रिपब्लिकन राजकीय आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात सध्या भाजपसोबत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे, तसेच शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहे. त्यामुळे आठवले आणि कवाडे महायुतीतून बाहेर पडतील का? असा प्रश्न या घडामोडीमुळे निर्माण झाला आहे. (AthawleKawade to join republician aghadi) राज्यातील छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या संघटनांना राजकीय आघाडीच्या स्वरूपात एकत्रित आणण्यासाठी एकिकृत रिपब्लिकन समिती ने वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांशी बोलणं करून नागपुरात बैठक बोलावली होती. (Ekkikrut Republic Samiti in Action For Vidhansabha)

बैठकीत आठवले, गवई, कवाडे या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व प्रमुख गटांसह आंबेडकरी विचारसरणीच्या सामाजिक संघटना तसेच बौद्ध महासभेच्या प्रतिनिधींनी ही सहभाग नोंदवला आहे. (Meeting Held For Republician Aghadi) सर्व छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांची आणि समविचारी सामाजिक संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा अंतिम उद्दिष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. सर्व रिपब्लिकन पक्षांचा एक पक्ष तयार होण्यास वेळ लागत असेल. तर तोवर रिपब्लिकन पक्षांची राजकीय आघाडी उभारावी आणि त्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, असा धोरणात्मक निर्णय ही त्या बैठकीत झाला आहे.

दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीनंतर तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असताना आता रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी उभारण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी समोर रिपब्लिकन पक्षांची ही नवी राजकीय आघाडी नवं आव्हान उभं करू शकते. (Challanges To Mahayuti And Mahavikas Aghadi)

Latest Posts

Don't Miss